Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय OLX वर विक्रीला ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय OLX वर विक्रीला ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय OLX वर विक्रीला ?
X

समाज माध्यमांमधे काय होईल याचा नेम नाही. काही दिवसापूर्वी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य स्टॅच्यू OLX वर विकायला काढल्याची जाहिरात आली होती. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालयही OLX वर काढलं विकायला काढल्याचं दिसून आलं आहे.

ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म OLX वर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाची विक्री केली जात असल्याच्या पोस्ट केलेल्या जाहिरातीची सध्या देशभरात चर्चा आहे. OLX वर पोस्ट केलेल्या या जाहिरातीत वाराणसीतील पंतप्रधान कार्यालयाची किंमत तब्बल साडे सात कोटी रुपये इतकी सांगण्यात आली आहे.



ऑनलाइन प्लॅटफॉर्म OLX नुसार लक्ष्मीकांत ओझा नावाच्या व्यक्तीने ही जाहिरात पोस्ट केली आहे. ओएलएक्सवर पोस्ट केलेल्या या जाहिरातीत वाराणसीतील पंतप्रधानांच्या संसदीय कार्यालयाचे चार फोटो पोस्ट करण्यात आले आहे. ज्यामधील तीन फोटो सध्याच्या पीएमओचा तर चौथा फोटो जुना पीएमओ कार्यालयाचा आहे. याशिवाय या पोस्टमध्ये या भवनाचा स्पेस एरिया 6500 क्वेअर फूट सांगितला आहे. यासोबत दोन फ्लोअरच्या भवनात 4 बेडरुम असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदीय कार्यालयाचे प्रभारी शिव शरण पाठक यांनी सांगितलं की, कार्यालयाच्या भवनाला विक्रीचा कोणताही विचार नाही. OLX वर केलेली पोस्ट पूर्णपणे चुकीची आहे. लक्ष्मीकांत ओझा यांचा या भवनाची काहीही संबंध नाही, असेही पाठक यांनी सांगितले. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या फेक जाहिराती पाहण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यूच्या विक्रीची जाहिरात ओएलएस्कवर पाहायला मिळाली होती.


याप्रकरणी पोलिसांनी आता चौघांना अटक केली असून त्यांची भेलपूर पोलिस ठाण्यात चौकशी सुरु आहे.

Updated : 18 Dec 2020 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top