Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - DRDOचं मिशन दिव्यस्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - DRDOचं मिशन दिव्यस्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - DRDOचं मिशन दिव्यस्त्र
X

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी सोमवारी संध्याकाळी मोठी घोषणा केली आणि डीआरडीओचे DRDOचं मिशन दिव्यस्त्र यशस्वी झाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, 'मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या DRDO शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. भारताने आज मिशन दिव्यस्त्राची चाचणी घेतली. मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी बनावटीच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची ही पहिली उड्डाण चाचणी होती.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत म्हणाले आहेत की "मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसितअग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या DRDO शास्त्रज्ञांना अभिमान असल्याची एक्स पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे.

Updated : 11 March 2024 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top