Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, क्वाड शिखर परिषदेत होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, क्वाड शिखर परिषदेत होणार सहभागी

'अब की बार ट्रम्प सरकार' अशी घोषणा अमेरिकेत जाऊन देणारे मोदी ट्रम्प सरकार पडल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. भारतासाठी हा दौरा का महत्त्वाचा आहे. वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, क्वाड शिखर परिषदेत होणार सहभागी
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये २४ सप्टेंबर २०२१ ला होणाऱ्या क्वाड देशांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिंदे सुगा यांचा सहभाग असणार आहे.

कोरोना महामारीला तोंड देत असताना पहिल्यांदाच चारही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची प्रत्यक्षात बैठक होणार आहे. यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर चर्चा केली जाणार असून देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी, तसेच हवामान बदल, तंत्रज्ञान, सायबर स्पेस आणि कोरोना लसींचा पुरवठा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

पहिल्यांदाच अमेरिकेत क्वाड शिखर परिषद होत असून या परिषदेचं नेतृत्व जो बायडेन करत आहे. दरम्यान या परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करणार आहेत.

जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.

क्वाड म्हणजे काय? what is quad group

क्वाड ला क्वाड्रिलेटेल सिक्मयोरिटी डायलॉग असे संबोधले जाते. हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा अनधिकृत सामरिक गट आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही देशांच्या हितांचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हाने हाताळणे हे क्वाड चे उद्दिष्ट आहे. क्वाडची स्थापना २००७ मध्ये झाली होती.

Updated : 21 Sep 2021 5:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top