Home > News Update > पंतप्रधान मोदींचा उज्बेकिस्तानचा दौरा आणि तीन महत्वाच्या बैठका, दौऱ्याकडे जगाचं लक्ष

पंतप्रधान मोदींचा उज्बेकिस्तानचा दौरा आणि तीन महत्वाच्या बैठका, दौऱ्याकडे जगाचं लक्ष

पंतप्रधान मोदींचा उज्बेकिस्तानचा दौरा आणि तीन महत्वाच्या बैठका, दौऱ्याकडे जगाचं लक्ष
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी उज्बेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ ला उज्बेकिस्तान देशातील समरकंद येथे शांघाई कॉरपोरेशन ऑर्गेनाइजेशन समिट पार पडणार आहे. या समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शिवाय पाकिस्तान चे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनंतर हे चारही राष्ट्रप्रमुख पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

हे देश आहेत शांघाई कॉरपोरेशन ऑर्गेनाइजेशनचे सदस्य

एकूण ८ देश या ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत त्यापैकी चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कजाकिस्तान, किर्गिस्तान, उजबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांचा समावेश आहे.

जगाच्या दृष्टीने शंघाई कॉरपोरेशन ऑर्गेनाइजेशनला महत्त्व का?

जगातील 40% लोक चीनमध्ये राहतात तसंच जगाच्या जीडीपीचा विचार केला तर 30% जीडीपी चीनचा आहे.

या बैठकिला इतकं महत्व का?

रशिया युक्रेन युध्द आणि त्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, चीनसोबत सुरू असलेला सीमावाद, आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेला काश्मीर मुद्दा या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर या चारही राष्ट्रांचे प्रमुख पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी या विषयावर या तिन्ही नेत्यांशी काय बोलणार याकडे संपुर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन चे राष्ट्रअध्यश शी जिनपिंग यांची गेल्या 2019 च्या ब्रिक्स समीटपासून एकही भेट नाही...

(ब्रिक्स सदस्य देश ब्राजील, रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रीका)

शिवाय रशिया युक्रेन युद्धानंतर मोदी पुतीन यांच्यात पहिल्यांदाच भेट होणार आहे. यामुळे या भेटीकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. मोदी यांच्या या दौऱ्याअगोदर भारत आणि चीनच्या सैनिकांनी गोगरा हॉट स्प्रिग पॉइंट वरून माघार घेतली आहे त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मानला जातोय.

महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सत्ता बदल झाल्यानंतरच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि मोदी यांची पहिलीच भेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तान च्या दृष्टिकोनातूनही या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

Updated : 14 Sep 2022 4:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top