Home > News Update > Republic Day : 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधन

Republic Day : 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधन

74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी सायं. 7 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

Republic Day : 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधन
X

देश 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करीत आहे. त्यापार्श्वभुमीवर देशासमोर असलेली आव्हाने आणि त्या आव्हानांना देश कशाप्रकारे सामोरे जात आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? यासह देशात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात करतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवरील राष्ट्रपतींच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) बुधवारी 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर सायंकाळी 7 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या (All india Radio) देशभरातील सर्व चॅनल आणि दुरदर्शनच्या (doordarshan) माध्यमातून देशाला संबोधित करणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रपती आधी इंग्रजी आणि त्यानंतर हिंदीमध्ये भाषण करतील.

भारतीय निवडणूक आयोग (Election commission of india) दरवर्षी स्थापना दिनाच्या निमीत्ताने राष्ट्रीय मतदाता दिवस (National Voter Day) साजरा करते. यंदा राष्ट्रीय मतदाता दिवस (National Voter Day 2023) 2023 चा विषय 'मतदान बेमिसाल, वोट जरुर डालेंगे हम' घेण्यात आला आहे. या अभियानाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग वाढवणे हा आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर विशेष पाहुणे म्हणून कायदामंत्री किरेन रिजेजू उपस्थित राहणार आहेत.

11 व्या मतदाता दिवसाच्या निमीत्ताने राष्ट्रपती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यात ज्या राज्यांमधील जिल्हा स्तरापासून निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 2022 मध्ये झालेल्या निवडणूक कार्यक्रमात विशेष योगदान दिले आहे. त्यांना उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Updated : 25 Jan 2023 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top