Home > News Update > मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून मुलांच्या लसीकरणासाठी विशेष सोय ; विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा

मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून मुलांच्या लसीकरणासाठी विशेष सोय ; विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा

मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून मुलांच्या लसीकरणासाठी विशेष सोय ; विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा
X

नवी दिल्ली : 3 जानेवारी म्हणजेच उद्यापासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोविन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतही लहान मुलाच्या लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिका शिक्षण विभागाकडून त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. सोमवारपासून मुंबईमध्ये 9 लसीकरण केंद्रावर लहान मुलांचं लसीकरण केले जाईल. सुरवातीला मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस दिली जाईल. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बसमधून लसीकरण केंद्रावर आणले जाणार आहे. तसेच लसीकरणानंतर पुन्हा त्यांना शाळेत सोडले जाणार आहे.

तर इतर खासगी शाळेतील विद्यार्थीही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून किंवा वॉक इन लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. ययासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु झाली आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी विद्यार्थी, पालकांनी घ्यायची आहे. लसीकरण केंद्रावर एखाद्या मुलाला त्रास होत असेल, तर त्यासाठी लसीकरण केंद्रावर पीडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

Updated : 2 Jan 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top