अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर

अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम चुकीच्या बँक खात्यामुळे किंवा खाते बंद पडल्यामुळे खात्यावर जमा झाली नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्याकांशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. आर.कुंडगीर यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार  सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन भरले आहेत. नवीन 18 हजार 349 व नुतनीकरण 36 हजार 435 एकूण 54 हजार 784 इतके विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या एकूण 54 हजार 784 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम 6 करोड 12 लाख रुपये पुणे कार्यालयातून जमा करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली किंवा नाही हे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा पाहता येईल.

काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. 9689357212 यांच्याशी संपर्क साधाण्यात यावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. आर.कुंडगीर यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here