सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण दोषी
X
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्या शिक्षेवरील सुनावणी 20 ऑगस्टला होणार आहे. प्रशांत भूषण यांनी केलेल्या दोन विथ मधून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.
सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या एका फोटो वरून प्रशांत भूषण यांनी एक ट्विट केले होते. ट्विटमुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे, असं सांगत एका वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी आपण एका सर न्यायाधीशांबद्दल वक्तव्य केलेले आहे, न्याय व्यवस्थेविरुद्ध वक्तव्य केलेले नाही, तसंच माजी सरन्यायाधीश देशांबद्दल केलेलं वक्तव्य देखील अभिव्यक्तिस्वातंत्र्या अंतर्गत येतं असा दावा प्रशांत भूषण यांनी केला होता.
जे ट्विट केलेले आहेत त्यामध्ये लोकशाहीला मारक अशा गोष्टीत करू नका असं सांगण्यात आलेले आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतं असा युक्तिवाद प्रशांत भूषण यांनी केला होता. पण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांचा हा युक्तिवाद अमान्य करत प्रशांत भूषण यांना दोषी ठरवलेले आहे. तसेच वेगळ्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याची गरज नसल्याचे देखील यावेळी कोर्टाने सांगितलं.