Home > News Update > प्रमोद सावंत यांचे पुन्हा येण्याचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अखेर साकार

प्रमोद सावंत यांचे पुन्हा येण्याचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अखेर साकार

गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. मात्र, मुख्यमंत्री पदाची माळ प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पडणार का? या बाबत शंका उपस्थित केली जात होती.

प्रमोद सावंत यांचे पुन्हा येण्याचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अखेर साकार
X

पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपने सत्ता मिळवत आपला वरचष्मा कायम राखला आहे. तर गोव्यात प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री पदी बसवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाले आहे. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येण्यात अपयश आल्यानंतर गोवा ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे.

गोव्यात आज झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांची गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर सावंत यांच्या नावाची घोषणा केली.

गोव्यातील भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रमोद सावंत यांच्या नावावर अगोदरच शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांची नेतेपदी निवड ही केवळ औपचारिकता होती.

विधीमंडळ पक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर प्रमोद सावंत उद्याच राज्यपाल पीएस पील्लई यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करू शकतात.

40 जागा असलेल्या गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपला 20 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतासाठी भाजपला एका जागेची आवश्यकता आहे. भाजपला एमजीपीच्या दोन आमदारांचा आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काठावरचं बहुमत मिळालेल्या भाजप ची गोव्यामध्ये मजबूत स्थिती आहे.


Updated : 21 March 2022 4:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top