Home > मॅक्स रिपोर्ट >  "मीच राजा, आठवले म्हणजे कागदी वाघ" !

 "मीच राजा, आठवले म्हणजे कागदी वाघ" !

 मीच राजा, आठवले म्हणजे कागदी वाघ !
X

“माध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार” असं वक्तव्य करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. दलितांचे नेते असलेल्या रामदास आठवले यांची सध्या समाजाशी असलेली नाळ तुटली आहे. या संधीचा फायदा घेऊन स्वत:चे नेतृत्त्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तुम्ही भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. असता त्यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वावर टीका केली.

“आठवलेंना मोठे करण्यात प्रसार माध्यमांचा हात”

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी रामदास आठवलेंवर चांगलेच बरसले. एरवी प्रसार माध्यमांनी रामदास आठवले संदर्भात प्रश्न विचारला असता, “कोण आठवले”? असा प्रतिसवाल प्रसारमाध्य़मांना प्रकाश आंबेडकर करतात. मात्र कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांनाच प्रकाश आंबेडकरांनी “तुम्ही उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवावे, असे सांगत आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला. रामदास आठवले हे माध्यमांच्या मदतीने दलित समाजाचे नेते झाले हे आंबेडकरांनी यावेळी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

Updated : 14 Jan 2018 6:14 AM GMT
Next Story
Share it
Top