Home > News Update > प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू ? ”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू ? ”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू ? ”
X

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जी-२० परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधलाय. प्रकाश आंबडेकर यांनी एका ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींना थेट ५ प्रश्न विचारले आहेत. यावर भाजपकडून अद्यापही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाहीये.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विटर पोस्टचं कॅप्शन ठेवलंय ‘स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत’ त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना सलग पाच प्रश्न विचारले आहेत. यामधील सगळेच प्रश्न हे आंतरराष्ट्रीय विषयांशी निगडीत आहेत. या प्रश्नांच्या खाली फेक विश्वगुरू असा आशय लिहिलेलं ग्राफिक्स जोडण्यात आलंय.

१) इंडोनेशियामध्ये झालेल्या #ASEAN शिखर संमेलनात भाषण करताना नरेंद्र मोदींनी कितीदा चीनचा उल्लेख केला?

२) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्लीतल्या #G20Summit कडे पाठ का फिरवली आहे, हे मोदी सांगू शकतील का?

३) रशिया आणि चीनला मान्य व्हावे म्हणून युक्रेन युद्धावरच्या परिच्छेदात भारताने सुचवलेले बदल अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी धुडकावून लावले आहेत हे खरे आहे का?

४) वर्षभराच्या अध्यक्षीय काळात चीन आणि रशियाचा विरोध पाहता युक्रेन युद्धाचा साधा उल्लेख असणारे किती संयुक्त निवेदने किंवा सर्वानुमते दस्तावेज निघाले?

५) दिल्लीतल्या संमेलनात कोणत्याच नेत्यांची घोषणा न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे का ? ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची घोषणा जाहीर होऊ शकला नाही, असा पहिला देश बनण्याची नामुष्की भारतावर ओढवणार आहे का ? आणि यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होणार नाही का ?

दरम्यान, जी-२० परिषद दिल्लीत होऊ घातलीय. त्यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट पाच प्रश्न विचारून राजकीय वर्तुळात चर्चेसाठी मुद्दे दिले आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या या पोस्टला भाजपकडून अजूनही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही.

Updated : 8 Sep 2023 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top