Home > News Update > एनकाउंटर स्पेशालीस्ट, राजकारणी ते जन्मठेप असा आहे प्रदीप शर्मा यांचा प्रवास

एनकाउंटर स्पेशालीस्ट, राजकारणी ते जन्मठेप असा आहे प्रदीप शर्मा यांचा प्रवास

एनकाउंटर स्पेशालीस्ट, राजकारणी ते जन्मठेप असा आहे प्रदीप शर्मा यांचा प्रवास
X

काहीवर्षापूर्वी मुंबईतल्या गुंडामध्ये दबदबा असणाऱ्या, एनकाउंटर स्पेशालीस्ट माजी पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. येत्या तीन आठवड्यांत जेलमध्ये हजर होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शर्मा हे राजकारणात सक्रिय होऊ पाहात होते. पण कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिला आहे. २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसातील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवले होते. मात्र राजकारणात त्यांना अपयश आले.

Updated : 25 March 2024 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top