Home > News Update > विविध अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा लांबणीवर

विविध अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा लांबणीवर

विविध अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा लांबणीवर
X

पुणे - विविध अभ्यास क्रमांसाठीच्या CET परीक्षा २०२४-२५ चे आयोजन एप्रिल आणि मे महिन्यात करण्यात आले होते. त्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता साधारण ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांन मध्ये बदल करण्यात आल्या आहेत.

या संदर्भातील सुधारित वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये झालेले बदल हे पुढील प्रमाणे आहेत.

सीईटी सेलने पूर्वी जाहीर केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रका नुसार एम.एच.टी सीईटी यापूर्वी १६ एप्रिल रोजी सुरू होणार होती व ३० एप्रिलला संपणार होती. आता ही परीक्षा २२ एप्रिल नंतर सुरू कऱण्यात येणार आहे. तर पी.सी.बी गटाची परीक्षा ही २२, २३ व २४, आणि त्या नंतर २८, २९, व ३० एप्रिल संपन्न होणार आहे. ह्या नंतर पी.सी.एम गटाची परीक्षा २ मे ते १६ मे दरम्यान होणार आहे. व पी.जी.पी-/एम.एससी /एम. एम.सी (पी&ओ) या सीईटी परीक्षांचा ह्या मध्ये समावेश असून, या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

मात्र ए.ए.सी सीईटीची ची परीक्षा पूर्वीच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार १२ मे रोजीच घेतली जाईल अश्यापद्धतीच्या सूचना समोर येत आहेत. तर बी.ए/ बी.एस.सी, बी.एड (४ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) च्या सीईटी परीक्षा ही पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २ मे रोजी होणार होती. मात्र ती परीक्षा आता १७ मे रोजी होणार आहे. त्याच बरोबर एम.ए.एच.एल.एल.बी ही परीक्षा १७ मे रोजी होईल.

संबंधित बदल लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर केल्या असून. सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या आपल्या अनेक विषयांच्या सीईटी च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. याची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://cetcell.mahacet.org/

Updated : 26 March 2024 5:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top