Home > News Update > नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
X

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी राजस्थानमधील उदयपुर येथे दोन युवकांनी दुकानात घुसून टेलरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही उमटले. तर देशात अनेकांनी नुपूर शर्मा यांचा विरोध तर काहींनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते. त्यातच नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी राजस्थानमधील उदयपुर येथे एका टेलरची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उदयपुर येथील कन्हैय्या लाल नावाच्या एका टेलरची चाकूने गळा कापून भरदिवसा हत्या करण्यात आली. तर याप्रकरणातील हल्लेखोरांनी व्हिडीओच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

कपडे शिवण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती कन्हैय्या लालच्या दुकानात आले. त्यांनी कपड्याचे माप देण्याचा बहाना करत कन्हैय्या लालवर तलवारीने सपासप वार केले. यामध्ये कन्हैय्या लाल याचा मृत्यू झाला तर कन्हैय्या लालचा सहकारी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटले होते. त्यानंतर एकीकडे नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत निदर्शनेही करण्यात आले होते. तर दुसरीकडे सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांचे समर्थन केले जात होते. त्यातच कन्हैय्या लाल या युवकाने दहा दिवसापुर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. तर त्याच रागातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. तर या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान हल्लेखोरांनी दुसरा व्हिडीओ पोस्ट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत चाकू पोहचवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यानंतर राजस्थान सरकारने हल्लेखोरांना अटक केली आहे. उदयपुर येथे घडलेल्या घटनेनंतर येथील व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्वधर्मीयांना शांततेचे आवाहन केले आहे. तसंच सामाजिक परिस्थिती बिघडू नये म्हणून इंटरनेट बंदी करण्यात आली आहे.

या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्वीट करून निषेध व्यक्त केला आहे. तर या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसंच पोलिस या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जातील, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिला आहे.

अशोक गेहलोत यांनी सर्वधर्मियांना शांततेचे आवाहन केले आहे. याबरोबरच जर कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला तर त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल. तसेच या घटनेचे व्हिडीओ शेअर करून कोणीही राज्याचा माहौल खराब करण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हटलं आहे. कारण व्हिडीओ शेअर केल्याने हल्लेखोरांचा उद्देश सफल होईल, असं मत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले आहे.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी टेलरची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांनी व्हिडीओ पोस्ट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हा चाकू पोहचवणार असल्याचे म्हटले आहे. तर हा व्हिडीओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट केला आहे.

Updated : 29 Jun 2022 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top