Home > News Update > मोदींकडून 'गलती से मिस्टेक' जिल्हा अधिकाऱ्यांना म्हणाले कोरोना केसेस वाढवा...

मोदींकडून 'गलती से मिस्टेक' जिल्हा अधिकाऱ्यांना म्हणाले कोरोना केसेस वाढवा...

मोदींकडून गलती से मिस्टेक जिल्हा अधिकाऱ्यांना म्हणाले कोरोना केसेस वाढवा...
X

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थिती कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या या चर्चेत मोदींकडून 'गलतीसे मिस्टेक' झाली आहे.

जिल्हा अधिकाऱ्यांशी (कलेक्टर) बोलताना मोदी म्हणाले, 'कोरोना पॉझिटीव्हच्या केसेस वाढल्या पाहिजेत. टेस्ट वाढवल्या पाहिजेत. आपल्याला सर्व गोष्टीवर लक्ष द्यायला हवं.'

मोदींच्या या चुकीच्या वाक्यावर कॉंग्रेसने निशाणा साधला आहे. मोदी कोरोना पॉझिटीव्ह केसेस वाढण्यासंदर्भात बोलत आहेत. त्यांच्या डोक्यात जे असतं तेच त्यांच्या भाषणातून समोर येतं.

पंतप्रधान फक्त केस वाढवण्यासाठी प्रयत्न करा. असं म्हणत नाही, तर स्वत: प्रयत्न देखील करत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकींच्या सभांची गर्दी मोजून कोरोना वाढवण्याचं पहिलं उदाहरण त्यांनी दिलं आहे.

तसंही जे डोक्यात सुरु आहे, तेच तोंडातून येतं.

अशा शब्दांत मोदींवर कॉंग्रेसने निशाणा साधला आहे.

वास्तविक पाहता मोदींना हे वाक्य बोलताना कोरोनाचे केसेस कमी करण्यासाठी प्रयत्न करा असं सांगायचं होतं. मात्र, मोदींकडून गलती से मिस्टेक झाली. आणि विरोधी पक्षांनी त्याच्यावर टीका केली नाही. असं होईल का?

Updated : 19 May 2021 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top