मला ६५ % मुस्लीमांनी मतं दिली – गुलाबराव पाटील

‘मला ६५ % मुस्लीमांनी मत दिली, ती मला हिंदू म्हणून दिली का? हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, बाकी धर्मांना चिरडून मारावे’ असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केलं आहे.

कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवकर यांचं जळगाव या त्यांच्या होम ग्राउंडवर शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी मॅक्समहाराष्ट्रशी त्यांनी खास बातचित केली. यावेळी त्यांनी ‘मला ६५ % मुस्लीमांनी मत दिली, ती मला हिंदू म्हणून दिली का? हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, बाकी धर्मांना चिरडून मारावे’ असं म्हणत सध्या देशात CAB आणि NRC शी वरुन होणाऱ्या विरोधावरुन भाजपला जोरदार टोल लगावला.

आगामी काळात आपण रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असून विरोधी पक्ष स्थगितीचा बाऊ करत आहे. असा आरोप देखील यावेळी पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला.

यावेळी विरोधकांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. “मी त्यांच्या छाताडावर भगवा घालून निवडून आलो आहे. आता आम्ही आमच्या स्टाईलने करणार. मी उद्धव ठाकरेंचा खास आहे. मी स्वामीनिष्ठ माणूस आहे.” असं म्हणत विरोधकांवर सडकून टीका केली.

महाविकासआघाडी बाबत बोलताना त्यांनी भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही दुश्मन का दुश्मन अपना दुश्मन असं म्हणत एकत्र आल्याचं म्हटलं आहे. पाहा काय म्हणाले गुलाबराव पाटील….