Home > News Update > योगींच्या 'अब्बा जान' वक्तव्यावरून गदारोळ, सर्वोच्च न्यायालय स्वत: लक्ष घालेल: महुआ मोईत्रा

योगींच्या 'अब्बा जान' वक्तव्यावरून गदारोळ, सर्वोच्च न्यायालय स्वत: लक्ष घालेल: महुआ मोईत्रा

योगींच्या अब्बा जान वक्तव्यावरून गदारोळ, सर्वोच्च न्यायालय स्वत: लक्ष घालेल: महुआ मोईत्रा
X

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'अब्बा जान' या विधानानंतर राजकारणात मोठं वादळ आलं आहे. आता विरोधकांनी त्यांच्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमधील एका जाहीर सभेत, "आज प्रत्येक गरिबाला मोफत राशन मिळत आहे. 2017 पूर्वी ज्यांना 'अब्बा जान' म्हटलं जायचं ते गरिबांच राशन खायचे. आणि नंतर हे राशन नेपाळ आणि बांग्लादेशात वाटलं जात असे. मात्र, आज जर कोणी गरीबांचे राशन खाण्याचा प्रयत्न केला तर तो कदाचित खाऊ शकणार नाही, पण तो नक्कीच तुरुंगात जाईल.

असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.

काय आहे वाद?

मुळात मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या वडिलांना 'अब्बा जान' म्हणतात. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा घेतला जात आहे की, मुस्लिम समाजातील लोक सर्व अन्नधान्य हिसकावून घेत होते आणि ते इतरांपर्यंत म्हणजेच हिंदूंपर्यंत पोहोचू देत नव्हते.

यादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथ यांच्यावर स्वत: कारवाई करावी. "एक निवडून आलेला मुख्यमंत्री उघडपणे धार्मिक मुद्द्यावर लोकांना भडकावत आहे. हे भारतीय दंड संहितेच्या कलम 153 चे उल्लंघन आहे. कोणी याची स्वतःहून दखल घेईल का?"

काँगेस ची प्रतिक्रिया?

या प्रकरणावर काँग्रेसने देखील योगींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी

"योगी साहेब तुम्ही कोणते 'जान' आहात? तुम्ही कोणते अब्बाजान आणि कोणते भाईजान आहात?"

हे संपूर्ण देशाला माहित आहे. अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

समाजवादी पार्टी

समाजवादी पक्षानेही योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनी...

साडेचार वर्षात उत्तर प्रदेशमध्ये फक्त घोटाळे केले आहेत. योगी यांना त्यांच्या साडेचार वर्षात त्यांनी काय केलं हे सांगू शकत नाही. म्हणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी इकडच्या - तिकडच्या गोष्टी करत आहेत. यावेळी भाजपला निवडणुकीत धक्का बसणार आहे.

उमर अब्दुल्ला

जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजप जातीयकरण आणि मुस्लिमांविरूद्ध द्वेष पसरवण्याव्यतिरिक्त कोणत्याही अजेंडावर निवडणूक लढवू शकत नाही. इथे एक असा मुख्यमंत्री आहे जो पुन्हा निवडून येऊ इच्छितो आणि दावा करतो की सर्व धान्य मुस्लिमांनी खाल्ले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेश मध्ये 2022 मध्ये निवडणूका आहेत. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढत आहे. योगी आदित्यनाथ यांनी या अगोदरही अशापद्धतीची विधान केली आहेत. त्यांनी म्हटलं होतं की,

"अब्बा जानने कार सेवकांवर गोळीबार केला होता."

दरम्यान, त्यांचा इशारा हा मुलायमसिंह यादव यांच्याकडे होता, ज्यांनी बाबरी मशिदीच्या घुमटावर चढलेल्या लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Updated : 13 Sep 2021 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top