Top
Home > Max Political > ‘तो’ पुन्हा येतोय...

‘तो’ पुन्हा येतोय...

‘तो’ पुन्हा येतोय...
X

निवडणूक प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असं आत्मविश्वासानं म्हणणारे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. आज विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे(bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला भाजपच्या १० आमदारांनी अनुमोदन दिलं.

पाहा व्हिडीओ...देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड

नगरसेवक, महापौर, आमदार आणि आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास राहीलाय. वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले. याशिवाय शरद पवार यांच्यानंतर सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री होण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे विधान परिषदेचे सदस्य होते. याशिवाय त्यांच्या काकू शोभा फडणवीस या ही राजकारणात होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं.

त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari )यांचा प्रभाव राहीलेला आहे. विरोधीपक्षात असताना विधानसभेतली अभ्यासपूर्ण भाषणं, माध्यमांसमोर भाजपची मांडलेली बाजू यामुळे फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यानंतर २०१४ साली मुख्यमंत्री बनल्यावर पक्ष आणि प्रशासनावर त्यांनी मजबुत पकड निर्माण केली. यावेळी मात्र त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा प्रभाव दिसला. आता मुख्यमंत्रीपदाचा पहिल्या ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास

१९९२ - अवघ्या २२ व्या वर्षी नागपूरच्या रामनगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले

१९९७ - २७ व्या वर्षी नागपूरचे सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून निवड

१९९९ - २९ व्या वर्षी नागपूर पश्चिममधून पहिल्यांदा आमदार

२००४ - नागपूर पश्चिममधून पुन्हा आमदार

२००९ - नागपूर दक्षिण-पश्चिममधून आमदार

२०१० - महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव म्हणून निवड

२०१३ - महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड

२०१४ - वयाच्या ४४ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

२०१९ – भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

Updated : 30 Oct 2019 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top