Home > News Update > मुंबईत पत्रकारांवर पोलिसांची दादागिरी, कारवाईची मागणी

मुंबईत पत्रकारांवर पोलिसांची दादागिरी, कारवाईची मागणी

मुंबईत पत्रकारांवर पोलिसांची दादागिरी, कारवाईची मागणी
X

मुंबईत लालबागच्या राजा गणेश मंडळाच्या इथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना एका पोलीस निरीक्षकाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. एका पत्रकाराला धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे. या पत्रकारांकडे आत जाण्याचा पास असतानाही त्यांना रोखण्यात आले, असे या पत्रकारांनी सांगितले आहे. लालबाग राजाच्या कव्हरेजसाठी सगळ्यांनी नियमानुसार पास काढले होते, पण पास असूनही सकाळपासून पोलिसांनी एन्ट्री दिली नाही. तरीही अधिकाऱ्यांना विनंती करुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न पत्रकार करत होते.

पण पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी अरेरावी केल्याचा आरोप या पत्रकारांनी केला आहे. त्यांनी धक्के देऊन पत्रकारांना बाहेर काढायला सुरुवात केली. एवढेच नाही तर हात काय पण पायही लावेन अशी धमकी देखील या व्हिडिओमध्ये ते देताना दिसत आहेत.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारे दादागिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Updated : 10 Sep 2021 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top