Home > News Update > महिलेची चारित्र्य परीक्षा, पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेची चारित्र्य परीक्षा, पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेची चारित्र्य परीक्षा, पोलिसांत गुन्हा दाखल
X

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात एका महिलेला चारित्र्याची परीक्षा देण्यासाठी उकळत्या तेलात हात घालावा लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी मांडली आहे. गावातील एक व्यक्ती व परांडा पोलीसातील एका कर्मचाऱ्याने आपल्यावर अत्याच्यार केल्याची तक्रार तिने सोलापुर पोलीसांत केली आहे. यानंतर सोलापुर ग्रामीण पोलीसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिडीतेच्या विनंतीवरून आरोपी भगवान धनवे व पोलीस कर्मचारी खुणे यांच्या विरूध्द अत्याच्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उकळत्या तेलात हात घालायला लावल्याप्रकरणी जात पंचायत निर्मुलन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Updated : 24 Feb 2021 11:15 AM GMT
Next Story
Share it
Top