Home > News Update > मराठा आरक्षण: बीडच्या मोर्च्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मराठा आरक्षण: बीडच्या मोर्च्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मराठा आरक्षण: बीडच्या मोर्च्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
X

औरंगाबाद: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाची घोषणा केली होती, त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून तयारीसुद्धा सुरू होती. तर आज सकाळपासून विविध जिल्ह्यातून विविध संघटना आणि मराठी क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते बीडकडे निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोर्चाला जाणार या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.


आज सकाळी बिडकीन पोलिसांनी मोर्च्यासाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकर्यांना ताब्यात घेतले असून,पोलीस ठाण्यातच स्थानबंद केले आहे.

तर बीड जिल्ह्याच्या एन्ट्री पॉइंटवर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मोर्चाला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अडवलं जात असल्याचं बोलले जात आहे.

असं असताना दुसरीकडे मोर्चाला परवानगी नसल्याचं कळतंय. मात्र परवानगी नसली तरीही मराठा मोर्चा निघणारच अशी ठाम भूमिका विनायक मेटे यांनी घेतली आहे.

Updated : 2021-06-05T12:51:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top