News Update
Home > News Update > मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांची पोलिसांकडून धरपकड

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांची पोलिसांकडून धरपकड

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांची पोलिसांकडून धरपकड
X

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. शुक्रवारी ( 17 सप्टेंबर रोजी) सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहेत. मात्र त्यांचा दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे.

औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी रमेश केरे यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच आज रात्रभर आणि उद्या मुख्यमंत्र्यांचा दौरा संपेपर्यंत त्यांना पोलोसांच्या ताब्यात ठेवले जाणार असल्याचे सुद्धा कळतंय.एमआयएम आणि मनसेचा सुद्धा विरोध...

ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याची परवानगी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाकडे मागितली होती.मात्र ती नाकारण्यात आली आहे. तर मनसेनं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय.

Updated : 16 Sep 2021 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top