Home > News Update > पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट वाहतुकीसाठी १५ दिवस बंद राहणार

पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट वाहतुकीसाठी १५ दिवस बंद राहणार

पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट वाहतुकीसाठी १५ दिवस बंद राहणार
X

रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुढील १५ दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना देण्यात आल्या आहे.

कोकण व महाबळेश्वरला जोडणारा हा आंबेनळी घाट हा पर्यटकांच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोकणात होणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे दरड कोसळे आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरून वाहतुक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवून मोठया प्रमाणांत जिवित व वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात येऊन, पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग आहेत, असे अभिप्राय सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावरील कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी या अधिसूचनेच्या पुढील पंधरा (१५) दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंदी आदेश जारी केला आहे.

Updated : 30 July 2023 7:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top