Home > News Update > नरेंद्र मोदींनी कठीण काळात देशाचं नेतृत्व केलं- संजय राऊत

नरेंद्र मोदींनी कठीण काळात देशाचं नेतृत्व केलं- संजय राऊत

नरेंद्र मोदींनी कठीण काळात देशाचं नेतृत्व केलं- संजय राऊत
X

गेल्या काही वर्षांमध्ये संजय राऊत हे सातत्याने सामनातून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. मात्र आज संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे.

संजय राऊत सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना पहायला मिळतात. मात्र आज संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतूक केल्याचं पहायला मिळालं.

संजय राऊत म्हणाले, आज पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून देशाची सेवा घडत राहो, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी संजय राऊत म्हणाले, जो पर्यंत ते सत्तेत आहेत. तोपर्यंत त्यांना समस्यांशी संघर्ष करण्याचे बळ मिळो. कारण पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केले आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. तसेच देशासमोर मणिपूरपासून बेरोजगारी व महागाई पर्यंत अशा अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

Updated : 17 Sep 2023 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top