Home > News Update > PM Narendra Modi Speech : घराणेशाहीवरून हल्ला, युवकांना सल्ला, वाचा पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील 10 मुद्दे

PM Narendra Modi Speech : घराणेशाहीवरून हल्ला, युवकांना सल्ला, वाचा पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील 10 मुद्दे

PM Narendra Modi Speech : घराणेशाहीवरून हल्ला, युवकांना सल्ला, वाचा पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील 10 मुद्दे
X



77 व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवरून हल्लाबोल केला. ( PM Narendra Modi Speech on Nepotism)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech from Red Fort) यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच भाषणात देशवासियांना असे न संबोधता मेरे परिवारजनों असं म्हटलं.

दहा वर्षात केलेल्या कामांची वाचली यादी

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात जलशक्ती मंत्रालय, कौशल्य मंत्रालय, 5G , खतांच्या किंमतीवर नियंत्रण, भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील लढाई, अशा कामांची यादी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील संबोधनादरम्यान सांगितली.

तिसऱ्यांदा सरकार बनवण्याचा विश्वास

पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटले होते की, मी 2014 मध्ये तुम्हाला जो वायदा केला होता. जो विश्वास दिला होता. तो पूर्ण केला. त्यानंतर देशाने भरभरून प्रेम देत 2019 मध्ये पुन्हा संधी दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी म्हणाले, 2047 मध्ये भारत विकसित राष्ट्र बनायला हवे. त्यामुळे 2047 चं स्पप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा 2024 मध्ये मला तुमचा आशिर्वाद हवा आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

हजार वर्षांच्या गुलामीचाही उल्लेख

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, हजार वर्षांपुर्वी बाहेरून कुणीतरी येतो आणि आपलं छोटंस राज्य स्थापन करतो. त्यातून देश हजार वर्षांच्या गुलामीत गेला.

हजार वर्षानंतर भव्य भारत बनवण्याचा उल्लेख

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, हजार वर्षांची गुलामी मोडून भारताने स्वातंत्र्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता या अमृतकाळात भव्य भारत बनवण्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी केला. कौशल्य, तंत्रज्ञान, अशा विविध क्षेत्रात भारताला भव्य आणि विकसीत बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

मोदींनी सांगितल्या तीन विकृती

पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 75 वर्षात या देशात अनेक विकृती वाढल्या आहेत. त्यातील तीन महत्वाच्या विकृती म्हणजे भ्रष्टाचार. घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण. या तीन विकृतींमुळे देशाची मोठी हानी झाल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला.

मोदींच्या भाषणात दोन वेळा मणिपूर

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात दोन वेळा मणिपूरचा उल्लेख केला. भाषणाला सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, देशासमोर अनेक संकटं आहेत. मणिपूरमध्ये गंभीर घटना घडल्या आहेत. या घटनांचे कुणीच समर्थन करू शकत नाही. मात्र आता मणिपूरमधून शांततेच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. तसेच त्यानंतर आपल्या भाषणात दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरचा उल्लेख केला. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, हा देश संवेदनशील आहे. जर मणिपूरमध्ये घटना घडली तर वेदना महाराष्ट्राला होतात.

मोदींनी केले महागाईवर भाष्य

पंतप्रधान मोदी यांनी भारतासमोर असलेल्या संकटांची माहिती देतांना सांगितले की, सध्या जगात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. मात्र भारताने महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामध्ये मोदी म्हणाले, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट आयात करतो. त्यावेळी त्या तंत्रज्ञान आणि वस्तूसोबत आपण महागाईसुद्धा आयात करत असतो. त्यात खतांच्या किंमती इतर देशांमध्ये तीन हजार रुपयांच्या आसपास आहेत. मात्र आपल्या देशात सरकारने खतांवर सबसिडी देत खतांच्या किंमती तीनशे रुपयांवर रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी घातली ओबीसींना साद

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशातील ओबीसींना साद घातली. यावेळी मोदी म्हणाले, विश्वकर्मा दिनाच्या निमीत्ताने देशातील कारागिरांसाठी योजना आणण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा देशातील ओबीसी समाजाला होईल. त्यामध्ये सोनार, लोहार, सुतार अशा कारागिर समुदायाला या योजनेचा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच जागतिक विश्वकर्मा दिनाच्या निमीत्ताने विश्वकर्मा योजना आणण्यात येईल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या हाती देणार ड्रोन

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सेल्फ हेल्प गृपच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणार आहोत. त्यामध्ये 15 हजार गृपच्या माध्यमातून महिलांचे कौशल्य विकसित करून त्यांच्या हाती ड्रोन देण्यात येईल. ज्याचा उपयोग कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होईल, असं म्हणत 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा विचार असल्याचेही पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

Updated : 15 Aug 2023 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top