Home > News Update > पंतप्रधान जनतेशी साधणार संवाद

पंतप्रधान जनतेशी साधणार संवाद

पंतप्रधान जनतेशी साधणार संवाद
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याबाबत सगळ्यांनाच आता उत्सुकता आहे. कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणामधील अडथळे, खालावलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर पंतप्रधान नेमकं काय भाष्य करतात याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला ठराविक अंतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधत होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींनी असा संवाद साधलेला नव्हता, त्यामुळे आज ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधत होते पण आता पहिल्यांदाच पंतप्रधानांनी आपली वेळ बदलली आहे आणि आता ते संध्याकाळी पाच वाजता बोलणार आहेत.

Updated : 7 Jun 2021 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top