Home > News Update > -#Parliammentsession : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन

-#Parliammentsession : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन

-#Parliammentsession : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन
X

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. कृषी विधेयक रद्द करण्यासाठीचे विधेयक पहिल्याच दिवशी मांडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये विरोधकांना आवाहन केले. सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्याचसोबत अधिवेशनादरम्यान विरोधकांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले. या हिवाळी अधिवेशनात संसद देशाच्या हितावर चर्चा करेल, देशविकाचे मार्ग शोधण्याचे काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. संसदेच्या अधिवेशना दरम्यान गोंधळात किती तास वाया गेले हा मापदंड असण्यापेक्षा संसदेत किती काम झाले याचा विचार होणे गरजेचे आहे. सरकार प्रत्येक विषयावर चर्चेला तयार आहे, विरोधकाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे, पण शांतता कायम ठेवून प्रश्न विचारायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतरही विरोधकांनी आपला आक्रमकपणा सुरूवातीला दाखवून दिला, लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्यास सुरूवात केली. कृषी कायद्यांवर सरकारने माघार घेतली असली तरी हमीभाव, पेगॅसस या विषयांवर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.

Updated : 29 Nov 2021 6:48 AM GMT
Next Story
Share it
Top