Top
Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला दुसरा डोस
X

देशभरात कोरोनावरील लसीकरणाबाबत अऩेक ठिकाणी उदासीनता दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सकाळी कोरोना लसीची दुसरा डोस घेतला. दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे. १ मार्चल रोजी मोदींनी कोरोनावरील भारतीय लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीकरणाबाबत लोक उदीसान असल्याचे दिसत असताना पंतप्रधान मोदींनी लस घेतल्यानंतर अनेक ठिकाणी लसीकरणाची टक्केवारी वाढल्याचे दिसले आहे.

"एम्समध्ये आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला पराभूत करण्यासाठी असलेल्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही कोरोना लसीकरीत ठरवून दिलेल्या निकषात बसत असाल तर लगेच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा".असे आवाहन मोदींनी केले आहे. देशात सध्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेचा तडाखा मोठा आहे. त्यावर लसीकरण हाच एकमेव उपाय सध्यातरी दिसतोय.

Updated : 8 April 2021 2:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top