संजय राऊत यांनी केली मोदी सरकारची स्तुती, ‘हे’ आहे कारण

आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने विविध माध्यमं मोदी सरकारच्या कामाचं मुल्यमापन करणारे कार्यक्रम आयोजित करत आहे. या संदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज तक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकार च्या काळात काही महत्वाचे निर्णय झाले आहेत.
आम्ही विरोधी बाकावर बसलो असलो तरी आम्ही त्याची नेहमीच स्तुती केली आहे. मोदी सरकार 2 ला येऊन 1 वर्ष तर झालं आहे. त्यात हे कोरोनाचं संकट. मात्र, ट्रिपल तलाख, कलम 370 हे मोदी सरकार ने घेतलेले चांगले निर्णय आहेत. अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारची स्तुती केली आहे.
मात्र, देशाची अर्थव्यवस्था गेल्या वर्षभरापासूनच ढासळली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.