Home > News Update > Surat Bullet train Station : PM Modi यांनी केली पाहणी, कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

Surat Bullet train Station : PM Modi यांनी केली पाहणी, कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

Surat Bullet train Station : PM Modi यांनी केली पाहणी, कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
X

देशातील पहिली Bullet ट्रेन बुलेट ट्रेन गुजरातमध्ये सुरु होणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून लवकरच या बुलेट ट्रेनचं ट्रायल सुरु होणार असल्याची शक्यता आहे.15 नोव्हेंबर 2025 शनिवारी बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गुजरात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोरच्या प्रगतीचा आढावा घेतला. नरेंद्र मोदी यांच्या एक्सवर(ट्विटर) या प्रकल्पाची पाहणी केल्याचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

https://x.com/narendramodi/status/1990078455430717515?s=48&t=2Xznuip1KV1MMpo5k2O5dg

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दौऱ्यात सुरत बुलेट ट्रेन स्टेशनची पाहणी केली. तसेच या ठिकाणी कामात गुंतलेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. कामात काही अडचणी येत आहेत का ? प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने काम सुरु आहे ? यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले की प्रत्येक स्तरावर पूर्ण मेहनतीने काम केलं जात आहे. यावेळी मोदींना त्यांच्या कामाचे कौतुक करत हा प्रकल्प केवळ गुजरातसाठीच नाही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये एकूण 12 स्टेशन आहेत. ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अंतर 2 तास 7मिनिटात पूर्ण करेल. यामुळे प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. गुजरातमधील सूरत आणि नववारीच्या बिलिमोरा याठिकाणी पहिली ट्रायल रन सुरु होणार आहे. 2028 पर्यंत या प्रोजेक्टच संपूर्ण काम होणार असल्यास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

मुंबई- अहमदाबादमध्ये देशातील पहिली बुलेट ट्रेन धावण्याचं स्वप्न म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

Updated : 17 Nov 2025 11:31 AM IST
Next Story
Share it
Top