Home > News Update > रशिया युक्रेन युध्दाबाबत भारताने स्पष्ट केली भुमिका

रशिया युक्रेन युध्दाबाबत भारताने स्पष्ट केली भुमिका

रशिया युक्रेन युध्दाबाबत भारताने स्पष्ट केली भुमिका
X

रशिया युक्रेन युध्द सुरू होऊन दोन महिने पुर्ण होत आले आहेत. मात्र तरीही हे युध्द थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रशिया युक्रेन युध्दाबाबत भारताने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. तर या युध्दाचे भारतासह संपुर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जर्मनी दौरा महत्वाचा ठरणार आहे. तर या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ कोलझ यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया युक्रेन युध्दाबाबत भारताची भुमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रशिया आणि युक्रेन युध्द सुरू झाल्यापासून आम्ही युध्दविरामासाठी आग्रह धरत आहोत. तर हा वाद चर्चेनेच मिटवला जाऊ शकतो. कारण या युध्दात कोणत्याही एका देशाचा विजय होणार नाही. मात्र जगभरातील सर्व विकसनशील देशांचा पराभव होणार आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनने हे युध्द थांबवायला हवे, अशी भुमिका भारताने घेतली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जर्मनीचे चान्सलर ओलाफ कोलाझ यांनी रशिया युक्रेन युध्दाबाबत बोलताना म्हटले की, आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना आवाहन करत आहोत की त्यांनी हा नरसंहार थांबवावा. आपले सैन्य माघारी बोलवून आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

भारताने आतापर्यंत तटस्थ भुमिका घेतली होती. मात्र यावेळी भारताने या युध्दाच्या जय-पराजयाबद्दल भाष्य करत अप्रत्यक्षपणे रशियावर टीका केली असल्याचे मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे याचा भारत रशिया संबंधावर काही परिणाम होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 3 May 2022 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top