माझा पुतळा जाळा… पण देशाची संपत्ती जाळू नका

Courtesy : Social Media

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीमधील रामलीला मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर भाष्य केलं आहे. सोबतच दिल्ली निवडणुकीस अनुसरुन भाजप सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचत दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

“देशात हिंसक वातावरण निर्माण झालं आहे. नागरी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यावर “तुम्हाला मोदींचा पुतळा जाळायचा असेल तर जरूर जाळा. पण, देशाची संपत्ती जाळू नका. गरिबांची झोपडी किंवा ऑटोरिक्षा जाळू नका. काही जण पोलिसांवर दगडफेक करत आहेत.

हे ही वाचा…

आमदारांची नवी बॅच
सरकार आता NPR च्या तयारीत
NRC आणि CAA बद्दल सरकार हे मुद्दे का स्पष्ट करत नाही ?

त्यांना मारहाण करत आहेत. यातून काय मिळणार आहे. तुमचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना तुम्ही मारताय. तुमचं रक्षण करणाऱ्यांना मारून तुम्हाला काय मिळेल? नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांच्या हातात दगड, लाठ्या पाहतो, तेव्हा त्रास होतो, ” असं मोदींनी म्हटलं आहे.

“CAA हे भारताच्या हिंदू अथवा मुस्लीम कुणासाठीही नाहीये. देशातल्या १३० कोटी लोकांशी याचा काहीही संबंध नाही. NRC विषयी अफवा पसरवल्या जात आहे. काँग्रेसच्या काळात हे विधेयक तयार करण्यात आलं होतं. आमच्या सरकारच्या काळात NRC संबंधित चर्चाही झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आसाममध्ये हे लागू करण्यात आलं होत. तेव्हा काय झोपले होते का?” असा सवाल मोदी यांनी यावेळी विचारला.