Home > News Update > आज पीएम किसान योजनेचा नववा हप्ता मिळणार : 11 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार

आज पीएम किसान योजनेचा नववा हप्ता मिळणार : 11 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार

अनेकदा टीका आणि घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेली केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा २ हजार रुपयाचा नववा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते आज 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

आज पीएम किसान योजनेचा नववा हप्ता  मिळणार : 11 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार
X

courtesy social media

केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतात. सरकारनं आतापर्यंत 8 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. दुपारी 12.30 वाजता एका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील 9.75 कोटी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 19,500 कोटी रुपये वर्ग करणार आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दुपारी बारा वाजता मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधून नवव्या हप्त्याची सुरुवात करणार आहेत.

10 ऑगस्टपर्यंत पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. प्रत्येक हप्त्याची रक्कम वर्ग करताना नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना संबोधित करत असतात, आजही ते देशाला संबोधीत करणार आहेत.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी, अशी मागणी केली आहे.

सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.

या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. घटनात्मक पदावरील व्यक्ती (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ.) आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर), आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय

१. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.

२.CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.

३.शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.

Updated : 9 Aug 2021 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top