Top
Home > News Update > शासकीय रुग्णालयासमोरच डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके

शासकीय रुग्णालयासमोरच डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके

शासकीय रुग्णालयासमोरच डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके
X

नांदेड : जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ डुकरांनी एका मानवी देहाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कचराकुंडीच्या बाजूला एका मानवी मृतदेहाचे लचके डुकरं तोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या कचराकुंडी लगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसतो आहे. बुधवारी सकाळी काही डुकरं त्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. मृत व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती रुग्णालयात आली होती का, कचराकुंडीजवळ त्या व्यक्तीचा मृतदेह कसा आला हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबद्दल तपासानंतरच काहीतरी माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Updated : 20 Jan 2021 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top