Home > News Update > पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ; मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ; मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

पेट्रोल-डिझेलचे दर  स्थिर ; मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर
X

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केलेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहे. दरम्यान काल देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर एवढा आहे. जरी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नसले तरी देखील आजचे दर सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारेच आहेत. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात करण्याच निर्णय घेतला होता. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीत आज 1 लीटर पेट्रोलचा भाव 103.93 रुपयांवरून कमी होऊन 95.41 रुपये प्रति लीटर झाला आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

Updated : 8 Dec 2021 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top