Home > News Update > Petrol diesel price : सलग 20 दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, वाचा काय आहेत आजचे दर

Petrol diesel price : सलग 20 दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, वाचा काय आहेत आजचे दर

पाच राज्यांच्या निवडणूकांनंतर इंधनाचे दर वाढायला सुरूवात झाली होती. मात्र गेल्या 20 दिवसापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभुमीवर हा सामान्य नागरिकांसाठी दिलासा मानला जात आहे. (Petrol diesel price)

Petrol diesel price : सलग 20 दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, वाचा काय आहेत आजचे दर
X

सलग पाच महिने पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र त्यानंतर पाच राज्यांच्या निवडणूकांनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरूवात झाली. तर 5 नोव्हेंबर 2021 पासून 20 मार्च 2022 पर्यंत पेट्रोलचे दर 109.98 रुपये इतके होते. मात्र 20 मार्चनंतर इंधनाचे दर वाढण्यास सुरूवात झाली. तर आता पेट्रोलचे दर 120.51 रुपयांवर पोहचले आहेत.

एकीकडे महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे इंधनाचे दर वाढत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले होते. मात्र गेल्या 20 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तर हा सामान्य नागरिकांना दिलासा मानला जात आहे.

20 मार्च 2022 ते 6 एप्रिल 2022 या 17 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात 10.53 रुपये इतकी तर डिझेलच्या दरात 10 रुपये इतकी वाढ झाली होती. मात्र 6 एप्रिलनंतर 20 दिवस पुर्ण होत आहेत. मात्र या 20 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. हा सामान्य नागरिकांसाठी दिलासा मानला जात आहे.

कोरोना नंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि रशिया युक्रेन युध्दामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली मोठ्या प्रमाणातील वाढ यांमुळे देशातील तेलाचे दर वाढत होते. मात्र गेल्या 20 दिवसांपासून देशात इंधनाचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे.

आजचे दर (Todays Petrol Diesel price)

  • पेट्रोल (Petrol)- 120.51 रुपये
  • डिझेल (Diesel)- 104.77 रुपये
  • घरगुती गॅस (LPG) - 949.50 रुपये
  • CNG – 72 रुपये
  • Auto Gas – 74.58 रुपये

Information source - https://www.goodreturns.in/petrol-price-in-mumbai.html

Updated : 25 April 2022 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top