Home > News Update > पेट्रोल डिझेलचे दर वाढणार, ओवैसींचे भाकीत

पेट्रोल डिझेलचे दर वाढणार, ओवैसींचे भाकीत

पेट्रोल डिझेलचे दर वाढणार,  ओवैसींचे भाकीत
X

पाच राज्यातील निवडणूकांचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना एएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इंधन दरवाढीबाबत मोठे भाकित केले आहे.

उत्तर प्रदेश निवडणूकीचा अंतिम आणि सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. त्यापार्श्वभुमीर प्रचार शिगेला पोहचला आहे. तर प्रचाराच्या अंतिम दिवशी ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधत इंधन दरवाढीबाबत भाकित केले आहे.

ओवैसी म्हणाले की, इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये कपात केली जात नाही. मात्र उत्तरप्रदेशमध्ये मतदानाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी किंवा दहा मार्चला मतमोजणी दिवशी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत, असे भाकित ओवैसी यांनी केले. तसेच भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून ओवैसी म्हणाले की, मोदी मोठ मोठ्या बढाया मारत असतात. परंतू भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाडीत मोदी पेट्रोल टाकतात का? असा सवाल ओवैसी यांनी केला.

7 मार्च किंवा दहा मार्चनंतर इंधनाचे दर वाढवले जातील आणि त्यासाठी रशिया आणि युक्रेनमधील युध्द कारणीभूत असल्याचा दाखला दिला जाईल. मात्र भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान हलवतात. त्यामुळे मोदी तुमच्या गाडीत पेट्रोल टाकतात काय? असे भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून ओवैसी यांनी विचारले.

Updated : 6 March 2022 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top