Top
Home > News Update > तुम्हाला लॉकडाउन हवे की नको?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

तुम्हाला लॉकडाउन हवे की नको?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

तुम्हाला लॉकडाउन हवे की नको?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल
X

गतवर्षी शेकड्यात वाढणारी कोरोना रुग्णाची संख्या आता हजारात वाढत आहे. राज्यातील कोरोना झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात असताना आहे.तुम्हाला लॉकडाउन हवे की नको? नियम पाळा मी आठ दिवसात निर्णय घेतो असं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला सांगितलं आहे.

राज्यात आतापर्यंत 9 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. माझं कोविड योद्ध्यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. आता बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला लस कधी मिळणार? यावर मी म्हणेण की ते वरच्याच्या हातात आहे. म्हणजे केंद्राच्या निर्णयावर आहे. दरम्यान, कोरोना विरोधात आपला मास्क हेच आपलं मुख्य शस्त्र असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपल्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढलं आहे. खरचं कोरोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेच्या धर्तीवर , `मी जबाबदार` ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांची केली प्रशंसा केली. ते म्हणाले, 'राऊत यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ सोहळा रद्द केला. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही दाखवतील, असे ते म्हणाले.

मधल्या काळात आपल्यात शिथीलता आली. माझ्यातही ती आली. मात्र, याचा परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात आज सात हजारच्यावर कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 15 दिवसांपूर्वी ही संख्या अडीच हजारच्या घरात होती. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काही लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रसंगी जीवाची बाजी लावली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अनेक ठिकाणी कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जात आहे. मात्र, असे करताना सामाजिक जबाबदारी पाळली जात नाही. अमरावतीत परिस्थिती गंभीर झाली आहे.राज्यात सध्या 53 हजार अॅक्टीव रुग्ण आहेत, असे ते म्हणाले.

लॉकडाउन नको असेल तर नियम पाळा. येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल.असं देखील त्यांनी सांगितलं आहे. कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Updated : 21 Feb 2021 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top