Home > News Update > मटन परवडते मग कांदे बटाटे का परवडत नाही ? केंद्रीय मंत्र्याने उडवली सामान्यांची खिल्ली

मटन परवडते मग कांदे बटाटे का परवडत नाही ? केंद्रीय मंत्र्याने उडवली सामान्यांची खिल्ली

सर्वसामान्यांची खिल्ली उडवणाऱ्या अनेक भाजप नेत्यांच्या यादीत आता आणखी एका केंद्रीय मंत्र्यांच्या नावाची भर पडली आहे. मटन परवडतं मग कांदे बटाटे का नाही परवडत असा सवाल करत महागाईवरून कपिल पाटील यांनी सर्वसामान्यांची खिल्ली उडवली आहे. कल्याणमधील रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.

मटन परवडते मग कांदे बटाटे का परवडत नाही ? केंद्रीय मंत्र्याने उडवली सामान्यांची खिल्ली
X

सर्वसामान्यांची खिल्ली उडवणाऱ्या अनेक भाजप नेत्यांच्या यादीत आता आणखी एका केंद्रीय मंत्र्यांच्या नावाची भर पडली आहे. मटन परवडतं मग कांदे बटाटे का नाही परवडत असा सवाल करत महागाईवरून कपिल पाटील यांनी सर्वसामान्यांची खिल्ली उडवली आहे. कल्याणमधील रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.

"कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदींना पंतप्रधान बनवलेले नाही. तर आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे. 750 रुपये किलोचे मटन आपल्याला महाग वाटत नाही मात्र दहा रुपये किलोचे कांदे आपल्याला महाग वाटतात. तर काही जण पनीर खातात. ते साडेचारशे रुपयांचे पनीर खातात पण त्यांना दहा रुपयांचे कांदे महाग वाटतात. याबरोबरच आपल्या मुलाने हट्ट केला तर त्याला पाचशे रुपयांचा पिझ्झा खाऊ घालतो. दोनशे रुपयांचे पेट्रोल खर्च करतो. पण चाळीस रुपयांचे टॉमेटो महाग वाटतात" असे वादग्रस्त विधान कपिल पाटील यांनी केले आहे.

एवढेच नाही तर कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदींना पंतप्रधान बनवले नाही, तर 370 कलम रद्द करणे, नागरीकत्व सुधारणा कायदा करणे यासारख्या महत्वाच्या निर्णयांसाठी मोदींना पंतप्रधान बनवले आहे, असा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर 2024 पर्यंत कदाचित मोदी पाकव्याप्त काश्मीरही भारतात घेतील, अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही, असेही ते बोलून गेले. त्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होईल असे दिसताच त्यांनी सारवासारव करत महागाईचे समर्थन आपण केलेले नाही, असे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत कपील पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी सचिन सावंत यांनी लोकसत्ताच्या बातमीला टॅग करत म्हटले आहे की, म्हणजे २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात मोदीजी आणणार नाहीत. तोपर्यंत उपोषण करायचे किंवा कांदे बटाटे तुरडाळ खरेदी करायची नाही. कंदमुळे खायची. हे किमान भाजपवाले सुरू करतील, अशी अपेक्षा आहे, असा टोला सचिन सावंत यांनी कपील पाटील यांना लगावला. तर पुढे सचिन सावंत म्हणाले की, २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात आला नाही तर देश राहणार नाही इति मोदी सरकार उवाच् , असे म्हणत कपील पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रीया व्यक्त केली.

Updated : 30 Jan 2022 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top