Home > News Update > पटेल-तटकरे यांच्यात मंत्रीपदावरून रस्सी खेच...

पटेल-तटकरे यांच्यात मंत्रीपदावरून रस्सी खेच...

पटेल-तटकरे यांच्यात मंत्रीपदावरून रस्सी खेच...
X

पुणे - राष्ट्रपती भवन दिल्ली येथे नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये १८ खासदार मंत्री पदाची शपथ घेणार आहे. या मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांची वर्णी मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये लागणार याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होती. दिल्ली येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना या पक्षातील कोणते नेते मंत्रीपदाची शपथ घेणार ही चर्चा चालू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील एक मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेला सहा, भाजपाला नऊ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली आहे. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक मंत्री पद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या दोनही नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

उद्या दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये होत असलेल्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्या वेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्री म्हणून कोण शपथ घेणार याबद्दल चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने नेमकं सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल शपथ घेणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र केंद्रीय मंत्री मंडळामध्ये वर्णि लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तटकरे आणि पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

Updated : 8 Jun 2024 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top