CAB ला संसदेची मंजूरी, देशाच्या संवैधानिक वाटचालीतला काळा दिवस : सोनिया गांधी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं 125 मतं पडली तर विरोधात 105 खासदारांनी मतदान केलं होतं. हे विधेयक पार पडल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशाच्या संवैधानिक वाटचालीतला आजचा काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षातच हे व्हावे याबद्दल देखील त्यांनी आपल्या पत्रात खंत व्यक्त केली आहे..

या विधेयकात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या मते. “हे विधेयक म्हणजे दुसरे काहीही नसून देशातीलच अल्पसंख्याक लोकांना लक्ष्य केलं जात आहे. हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधात आहे.” तसंच कॉंग्रेसचे एका खासदाराने धर्माच्या आधारावर नागरिकत्वाचा हक्क देणे हे देशाच्या धर्मनिरपेक्षेतेविरूद्ध आहे. हे विधेयक घटनेच्या मुलभूत संरचनेला तडा देणारे आहे. असं मत कॉंग्रेसने व्यक्त केलं आहे. तसंच या विधेयकातून कलम घटनेच्या 14 व्या कलमा चं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप कॉंग्रेसने घेतला आहे.

हे विधेयक लोकसभेत मांडण्यासंदर्भात मतदानात 293 विरूद्ध 82 मतांनी मंजूर करण्यात आलं. त्यानंतर या विधेयकासंदर्भात लोकसभेत मतदान पार पडलं होतं. या विधेयकाच्या बाजूनं 311 खासदारांनी तर 80 खासदारांनी विरोधात मतदान केलं होतं. आज राज्यसभेनं देखील या विधेयकाला मंजूरी दिल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतीच्या सहीसाठी जाईल राष्ट्रपतीने सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.