Home > News Update > हक्कांच्या घरासाठी पारधी समाजाचा मुख्य रस्त्यावरच ठिय्या

हक्कांच्या घरासाठी पारधी समाजाचा मुख्य रस्त्यावरच ठिय्या

हक्कांच्या घरासाठी पारधी समाजाचा मुख्य रस्त्यावरच ठिय्या
X

बीड : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र दुसरीकडे पारधी समाज अजूनही हक्कांच्या घरांसाठी संघर्ष करत आहे. त्यातच आज पारधी समाजाने थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला. हक्काचे घर मिळावे म्हणून गेल्या चार वर्षांपासून आदिवासी पारधी समाजाची मागणी आहे. अनेक वेळा आंदोलने देखील केली मात्र प्रशासनाकडून कसलीच दखल घेतली जात नसल्याने आज संतप्त पारधी कुटुंब मुला-बाळासह बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोरील मुख्य रस्त्यावरच ठिया घातला आहे. तब्बल दोन तास ठिया सुरू होता यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. जोपर्यन्त हक्काचे घर मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा पारधी कुटुंबाने घेतला आहे. वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले समजूत काढली. तर त्यानंतर काही वेळात आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून आम्ही आमच्या हक्कांच्या घरासाठी संघर्ष करत आहोत. मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळेच अखेर उद्विग्न होऊन रस्त्यावरच ठिय्या मांडावा लागला. तसेच आम्हाला कायम आश्वासनांची गाजरं दाखवली जातात. टोलवा-टोलवीची उत्तरं दिली जातात. मात्र आमच्या हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला जात नाही.

आमच्या घरातील लोकांना उघड्यावरच रहावे लागत आहे. तसेच आम्हाला शबरीमाला घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झाले आहेत. मात्र प्रशासनाच्या टोलवा टोलवीमुळे आम्हाला घरं मिळण्यात अडचणी येत आहेत, असा आरोप आंदोलक महिलेने केला. तर या आंदोलनाबाबत बीड येथील डीवायएसपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.


Updated : 10 May 2022 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top