Home > News Update > Parbhani Loksabha | जानकरांची गाडी आडवल्याने वातावरण तापले...! वाचा

Parbhani Loksabha | जानकरांची गाडी आडवल्याने वातावरण तापले...! वाचा

Parbhani Loksabha | जानकरांची गाडी आडवल्याने वातावरण तापले...! वाचा
X

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रासप नेते महादेव जानकर यांची गाडी अडवून गाडीची तपासणी केल्यामुळे मध्यरात्री परभणीत चांगलंच वारावरण तापलं होतं. यावेळी महादेव जानकर यांनी आरोप केला आहे की, माझी गाडी शिवसैनिकांनी तपासली असून अशा पध्दतीने गाडी आडवून तपासणी करणे अधिकारबाह्य असल्याचे जानकरांनी म्हटले आहे. याप्रकरणी महादेव जानकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदरील घटनेमुळे परभणीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नक्की काय घडलं होतं ?

परभणी शहरातील देशमुख हॉटेलच्या जवळ महादेव जानकरांची गाडी शहरातील काही तरुणांनी तपासली. विशेष महादेव जानकरांच्या गैरहजेरीमध्ये ही गाडी तपासली जात होती त्यावेळी गाडीत फक्त त्यांचा पी.ए. आणि गाडीचा चालक होता. अशा पध्दतीने गाडीची तपासणी करणे हे योग्य नसल्याचे आरोप जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांनी केले आहेत. नंतर या दोघांनीही नवा मोंढा पोलीस ठाण्यात ठिय्याच लावला. जानकरांच्या चालकाने याबाबत रितसर तक्रार दाखल केली असून संबंधित तरूणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यावर काय म्हणाले ?

महादेव जानकर आणि रत्नाकर गुट्टे हे नवा मोंढा पोलीस मध्यरात्री ज्यावेळी ठिय्या लावून बसले होते त्यावेळी पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी हे देखील पोलीस ठाण्यात उपस्थित होते. सदरील घडलेल्या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, संबंधित कार्यकर्त्यांनी अधिकार नसताना गाडीची तपासणी केली आहे. याबाबत आम्ही गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करू असं पोलिस अधीक्षक रविंद्र परदेशी यावेळी म्हणाले.

Updated : 25 April 2024 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top