News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > #Antalia : नवाब मलिक यांचा परमबीर सिंहांवर आणखी एक बॉम्ब !

#Antalia : नवाब मलिक यांचा परमबीर सिंहांवर आणखी एक बॉम्ब !

#Antalia : नवाब मलिक यांचा परमबीर सिंहांवर आणखी एक बॉम्ब !
X

राज्यासह देशाला हादरवुन टाकणाऱ्या अँटालिया प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik)यांनी आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अँटालिया (Antalia) प्रकरणाचे खरे सूत्रधार कोण आणि हा कट कसा रचला गेला, याची माहिती लवकरच समोर येईल असा दावा नवाब मलिक यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी परमबीर सिंह (parambir singh) आणि सचिन वाझेवर (sachin Vaze)गंभीर आरोप केले आहेत. अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याचा कट परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी रचल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. यामागे राजकीय हेतू होता असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात या दोघांनी सरकारला चुकीची माहिती दिली होती, तसेच मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतरही त्यांनी खोटी माहिती दिली असा आरोपही मलिक यांनी केला आहे. त्यामुळे चांदीवाल आयोगाचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी केलेला हा गौप्यस्फोट सोमवारी घडलेल्या एका मोठ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो आहे. परमबिर सिंह यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदिवाल आयोगापुढे परमबीर सिंह हजर झाले आणि त्याचवेळी तिथे सचिन वाझेलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण तिथेच या प्रकरणातील प्रमुख असलेल्या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी तासभर गप्पा मारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका संवेदनशील प्रकरणातील दोन आरोपींना अशा मनमोकळपणाने गप्पा मारण्याची संधी का साधली असा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळेच आता याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

दुसरीकडे परमबीर सिंह हे सध्या त्यांच्याविरोधात दाखल विविध गुन्ह्यांसाठी विविध पोलीस ठाण्यांमध्ये हजेरी लावत आहेत. पण ते सरकारी गाडी वापरत असल्याचे दिसते आहे. पण त्यांनी सरकारी गाडी वापरणे चुकीचे असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

सध्या परमबीर सिंह यांची खंडणीप्रकरणी सीआयडी चौकशी करत आहे. सोमवारी त्यांची 5 तास चौकशी करण्यात आली. दुसऱ्या दिवशीसुद्धा ते सीआयडी समोर हजर झाले आहेत. सीआयडीचे पाच अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. अँटालिया प्रकऱणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे आणि परमबिर सिंह १ तास चर्चा करतात आणि दुसऱ्याच दिवशी सत्ताधारी नवाब मलिक अँटालिया प्रकरणात परमबीर सिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप करतात, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येण्याची गरज आहे.

Updated : 2021-12-01T08:32:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top