परमबीर सिंह यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शिवसेनेचे सडेतोड उत्तर
X
खंडणीच्या वेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता नवा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सचिन वाझे याला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचना केल्य़ा होत्या, असा जबाब परमबीर यांनी EDला दिला आहे. सचिन वाझे याच्या नियुक्तीमध्ये आपली भूमिका काय होती, असा प्रश्न ईडीने परमबीर सिंह यांचा विचारला होता. त्यावर परमबीर सिंह यांनी आपला जबाब नोंदवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फोन करुन आपल्याला सचिन वाझेला सेवेत घेण्याची सूचना केली होती, असे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे.
पण परमबीर सिंह यांच्या या आरोपावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. परमवीर सिंह एक आरोपी आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर खंडणी अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आपल्या बचावासाठी असे नाव घेत असतो. आम्हीही पंतप्रधानांचे नाव घेतो फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे नाव घेतलं जात होतं. असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे.