Home > News Update > "माझा वाघ कोरोनाने टिपला.."

"माझा वाघ कोरोनाने टिपला.."

माझा वाघ कोरोनाने टिपला..
X

मुंबई: राज्यात कोरोनाचे भयंकर रूप पाहायला मिळत असून,मृतांची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला कोरोनात गमावले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही गुरुवारी आपल्या जवळच्या व्यक्तीला कोरोनामुळे गमावलं. पंकजा यांनी ट्विट करत,माझा अंगरक्षक कोरोनामुळे गमावला असल्याचं म्हंटल आहे.

''माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य माझा अंगरक्षक भाऊ गोविंद मुंडे #Covid_19 ने गमावला आहे, गोविंद यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो'' असं पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

राज्यात कोरनामुळे आतापर्यंत 61 हजार 343 लोकांचा जीव गेला आहे. तर दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असं असलं तरीही जोपर्यंत नागरिक कोरोनाचे नियम पाळणार नाही, तोपर्यंत कोरोना कमी होणार नसल्याचं दिसून येत आहे.

Updated : 22 April 2021 6:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top