Home > Election 2020 > ...तर राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं – पंकजा मुंडे

...तर राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं – पंकजा मुंडे

...तर राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं – पंकजा मुंडे
X

सर्वच पक्षाचे नेते सध्या प्रचारसभांमध्ये वेगवेगळ्य़ा विषयांवरुन जनतेला त्य़ांच्या पक्षाला मत देण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत. त्य़ात विरोधी पक्ष भाजपवर टीका करताना बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या साऱख्या विषयांवरुन मोदी सरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते मोदी सरकारच्या हातात देश कसा सुरक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातल्या त्यात सर्जिकल स्ट्राईकचा विषय आला तर... विषयच नाही. भारतानं पाकिस्तानचे किती मारले? यापासून तर पुरावे मागणाऱ्या विरोधकांना बॉम्बला बांधून परदेशात पाठवण्यापर्यंत भाजपचे नेते विधान करत आहेत. जालना जिल्ह्यातील जामखेड येथे भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांची जीभ चांगलीच घसरली.

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधीला पाठवायचं होतं दुसऱ्या देशामध्ये मग कळले असतं, असं वादग्रस्त विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Updated : 21 April 2019 1:20 PM GMT
Next Story
Share it
Top