Home > News Update > सिध्दू मुसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड

सिध्दू मुसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड

प्रसिध्द गायक सिध्दु मसुवालाच्या हत्येला आठवडा उलटून गेला आहे. मात्र या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच एकूण आठ आरोपींपैकी दोन आरोपी पुण्यातील असल्याने सिध्दू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन समोर आले आहे.

सिध्दू मुसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड
X

पंजाबी सरकारने सिध्दू मुसेवालाची सुरक्षा काढून घेतल्याच्या दिवशीच सिध्दू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. तर या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात ८ जणांची ओळख पटली आहे. तर त्यापैकी दोन जण पुणे जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.

सिध्दू मुसेवालाच्या हत्येसाठी महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधून आठ शुटर बोलवण्यात आले होते. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पोखरी या आदिवासी भागातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचा समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे. तर संतोष आणि सौरभ विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

सिध्दू मुसेवाला हत्या प्रकरणात नाव समोर आलेल्या संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी 1 ऑगस्ट 2021 रोजी राण्या उर्फ ओमकार बानखिले याची हत्या केली होती. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संतोष आणि सौरभ विरोधात मंचर पोलिस ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसेच राण्या बाणखेलेच्या खुनाच्या गुन्ह्यात या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र हे आरोपी फरार आहेत. दरम्यान हे आरोपी राजस्थान, पंजाब आणि हरियाणा भागात वास्तव्याला होते. तेथेही यांच्यावर गंभीर आरोप आहेत.


ग्रामीण तरुणांवर लॉरेनस् बिस्नोई गँगचा प्रभाव...

पुण्याच्या ग्रामीण भागात तरुणांवर लॉरेन्स बिस्नोई गँगचा प्रभाव असल्याचे समोर येत आहे. आज कालचे तरुण या गँगच्या मोहोरक्याप्रमाणे आपला पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपाळावर लाल कुंकू, दाढी साधारण वाढलेली, अंगावर काळे कपडे, गळ्यात काळी शाल, रुद्राक्षाची माळ, बंदुकी बरोबरचे फोटो असा पेहराव साधारण या गॅंगचा असतो. संतोष जाधव सुध्दा त्या गॅंगशी निगडित आहे. याशिवाय त्याने मंचर परिसरात गँग देखील तयार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.

Updated : 7 Jun 2022 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top