Home > News Update > नागपुरात व्हायरल भुताने पसरवली दहशत

नागपुरात व्हायरल भुताने पसरवली दहशत

नागपुरात मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची सावली सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हे फुटेज सोशल मीडीयावर व्हायरल करत त्यात भुत दिसत असल्याचा उल्लेख करण्यात आले आहे.

नागपुरात व्हायरल भुताने पसरवली दहशत
X

नागपूर : नागपुरात मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची सावली सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हे फुटेज सोशल मीडीयावर व्हायरल करत त्यात भुत दिसत असल्याचा उल्लेख करण्यात आले आहे. त्यामुळे नागपुरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी केली प्रकरणाची चौकशी

संबधित व्हिडीओ नागपूरच्या मानेवाडा भागातील असल्याची माहीती अंजनी पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला आहे याबाबत अंजनी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. दरम्यान ही पांढरी सावली रातकिड्याची असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

कुणीही अफवा पसरवू नये

दरम्यान या व्हिडिओबाबत लोकांमध्ये वेगवेगळी मत व्यक्त होत असून, तज्ज्ञांच्या मते विद्युत दाब कमी - जास्त झाल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची नेगिटीव्ह फिल्म तयार होते. आणि पांढऱ्या रंगांची सावली दिसते. अनेक ठिकाणी अशा पध्दतीने व्हिडीओ चित्रीत होत असतात. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं अमर वानकर आवाहन यांनी केले आहे.

भुत दाखवा, 25 लाख मिळवा

दरम्यान याबाबत नागपुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाहणी करत संबधित घराला भेट देत नागरिकांनी समुदेशन केलं आहे. काही वर्षांपूर्वी एक मुलीने या भागात आत्महत्या हत्या केल्याने तीच भुत बनून या भागात फिरत असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संबधीत लोकवस्तीतील लोकांची समजूत काढत, नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. सोबतच भूत दाखवून द्या, आणि 25 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी केले आहे.

Updated : 29 July 2021 1:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top