Home > News Update > पालघर,सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर,सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले

पालघर,सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
X

पालघर: जिल्ह्यात रात्रीपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प सर्वात जास्त पाणी क्षमता असलेला प्रकल्प असून धामणी धरण 97.51 टक्के भरले आहे. यामुळे गुरूवारी रात्री दोन वाजता धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघण्यात आले आहेत.

धामणी मधून 253.11क्युमेक आणि कवडास मिळून 618.66 क्यूमेक (21829 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. तसेच सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्याच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठीही पाणीपुरवठा करण्यात येतो. धरण क्षेत्रात आज 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 2583 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.





Updated : 27 July 2023 2:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top